मित्रहो, नमस्कार,
मी आज पासून ब्लॉग लिहायला सुरुवात करणार आहे. माझ्या ब्लॉगचा विषय समाजात असलेल्या कुप्रथांवर प्रहार करणे हा आहे व त्यानुषंगानेच माझे लेखन आहे.
आपल्या समाजात असलेल्या कुप्रथा, आपण सुशिक्षित असूनही त्या मानखाली घालून मुकाटपणे पाळत असतो व ते पाळण्यातच आपल्याला भलाई वाटत असते. ते पाहून मन उद्दिग्न होते. अस वाटते Whistleblower बनून समाजात असलेली व्यसनांधता, जातीभेद, अति-दैववाद, शुभाशकुन यांवर लेखनरूपाने प्रहार करावा व समाजप्रबोधनाचे काम करावे.
या उदात्त हेतूनेच, मी आपल्या समाजात असलेल्या सामाजिक कुप्रथांवर जसे भारतीय समाजात असलेली हुंडा प्रथा, व्यसनांधता, अंधश्रद्धा ई. अनेक विषयांवर काव्य रूपाने प्रहार करण्याचा प्रयत्न करीत असतो.
मला आपल्या मदतीची आवश्यकता आहे. कृपया माझ्या या ब्लॉगला नित्यनेमाने भेट देऊन व त्यावर प्रतिसाद देऊन मला उपकृत करण्याची कृपा करावी.
वरील नमूद विषयांवर माझा काव्यप्रपंच खालील प्रमाणे.
धन्यवाद.
या कथा/कवितेतील सर्व पात्र व घटना ह्या काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवनातील जिवंत वा मृत व्यक्तीशी व जाती धर्माशी काहीही संमंध नाही. यांच्याशी काही साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समझावा व कलाकृतींचा आनंद घ्यावा.
©२०२३ | संदीप देशमुख द्वारा सर्वाधिकार राखीव