अंधभक्त्त नका बनू

 

मित्र हो, काय अंधभक्त्त बनता

केवळ मंदिरदर्ग्यात जाऊन माथा टेकता

अन कोरड पाषाण ठरता

 

जशी देवावर अन त्याच्या पशुपक्षावर तुमची श्रद्धा आहे

तशीच त्या देवाला प्रिय असलेल्या

प्राण्यांचे, झाडांचे, पक्षांचे संवर्धन करून जडणघडण करा

त्यांची संख्या वाढवा,

देवीच नाव असलेल्या मुलीत/स्त्रीत त्याच देवीच अस्तित्व पहा

देवाला प्रिय असलेल्या वृक्षांची घरोघरी लागवड करा

व त्याचे रूपांतर एका वनात करा

 

देवाला प्रिय असलेल्या पशुपक्षाचे जतन करून त्यांची संख्या वाढवा 

अन केमिकलचे दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळा व पर्यावरण प्रदूषण दूर सारा

 

जर असे कराल तर कुण्या स्त्रीची बेअदबी होणार नाही,

कधी नापिकी होणार नाही, दुष्काळ पडणार नाही,

शेतीला जनावरांची कमतरता भासणार नाही

व पक्षांची चित्रे पुढच्या पिढीला दाखवून

हे पक्षी नामशेष झाले म्हणून सांगता येणार नाही

 

तेव्हाच तुमची देवासमोर केलेली प्रार्थना सफल होऊन

देव तुमची मनोकामना पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही