अवगूण

 

अरे मानवा

सोड अवगुणा

आशेच्या किरणासवे

बघ जीवना

होऊन उच्च विद्याविभूषित

देऊन व्यसनांना आधुनिकतेचा जाम

लावून दारू, सिगारेट ओठी

का गुरफटतोस मोहपाशात ?

 

कसा हा नर

करावा लागतो प्रचार, जाहिराती,

जबरदस्ती अन चर्चासत्रे

होवून हीन बद्त्तर

बाळगतो अंगी अडाणी लक्षणे

 

शिक्षणाने करावे

मनःपरिवर्तन समाजाचे

व्यसनमुक्त समाज करून

धिंडवडे काढावे व्यसनांचे

 

मनुष्य देह अति दुर्धर

मिळतो पुण्याईने फार

सजवावे जीवनाला

लावून सदगुणांचा लेप

व्यसनांची माया, प्रीती तयावरी

करिती सर्वस्वाचा अधःपात

सोड साथ व्यसनांची

नको गुरफटू त्यात

दारू, सिगारेट, तंबाखू

ही तर रूपे यमाची

लावून तोंडी तयांना

नको संपवू घडी आयुष्याची