देव, देव, करते माणूस हा वेडा
पहा त्याच्या माग झाला किती खुळा
तरी देवाला येत नाही दया
हयाची मात्र त्याच्यावरच माया
काढून कर्ज सावकाराच, स्वप्न पाहतो दर्शनाच
कबूल करतो मोठ–मोठाले नवस
तरीपण देव नाही पावत
घरी करते होमहवन, दक्षिणा देतो बामनाला
मंदिरात ही गेल्यावर पैसे टाकून दानपेटीत
गुपचूप मागण मागतो देवाला
देव आहे ना तो, लालूच कशाला दाखविता
यात्रा, होमहवन अन दक्षिणा देऊन
कशाला त्याला लाजविता
खरच देव आहे, तर कशाला एवढ कराव लागते
मनान दुवा मागा, तेवढ्यानही त्याच भागते
अवडंबर माजविणे देव्हाऱ्याचे, हे त्याला नाही पटत
धर कास मेहनतीची, पाहा देव कसा नाही भेटत