जेव्हा इतर धर्माचे लोक
महादेवाच्या पिंडीला, सरस्वतीदेवीला अथवा अल्लाला नावे ठेवतात
किंवा त्यांच्याबद्दल घाणेरडे बोलतात
तेव्हा तर काही आकाश फाटत नाही वा धरती दुभंगत नाही
किंवा जगात सुनामी येत नाही
ज्या देवांबद्दल घाणेरडे बोलले जाते ते देव मात्र
निर्विकार, शांतपणे डोळे मिटून
लोकांच त्यांच्याबद्दलच घाणेरड बोलण
एकल–ना–एकल्यासारख करून चूप बसतात
पण आम्ही मानव मात्र देवी–देवतांविषयी, कुठल्या पैगंबरविषयी
काही भलत–सलत बोलताच साऱ्या जगात गदारोळ माजवितो,
जाळपोळ करतो, कुणाचे “सर तन से जुदा” करतो,
मंदिरे, चर्चेस जाळतो तर कुणाच्या मस्जिदी तोडतो
त्यात मात्र आपल्या सारखा सामान्य माणूसच नाहक होरपळतो
पण मंदिर, मस्जिद, चर्च तोडून त्यात रक्तबंबाळ झालेला
देव, पैगंबर, जिझस मूग गिळून गप्प बसतो
मित्र हो जेव्हा देवाला हे समजते कि
मानव आपल्या नावावर समाजात तेढ माजवतोय,
दुसऱ्या समाजाबद्दल द्वेष पसरवितोय
पण तो देव “मनुष्य नादान आहे त्याला समज नाही“
हा विचार करून चूप राहतो
पण आपण मानव त्या बुद्धीदात्यापासून काहीही न शिकता
केवळ त्यांच्या मूर्तीला किंवा त्यांच्या अस्तित्वालाच पुजतो
व त्यांच्या अहिंसेच्या शिकवणुकीला हरताळ फासतो
म्हणूनच तो डोळे मिटून, स्वतःचे अस्तित्व लपवून
किंवा कृसावर लोकांना विधात्याची शिकवण समजत नसल्याबद्दल खंत व्यक्त करून
रक्तबंबाळ अवस्थेत, साऱ्या जगाकडे कीव करून, खिन्नपणे पाहत असतो