आकाश

आकाश नव्हे

हे तर सोने, चांदी, हिरे, माणके

यांचे भांडार

निसर्गाचे रंग पांघरुनी

दिशा चारही करिती शृंगार

सूर्य म्हणजे सोने, चंद्रमा जणू चांदी

लुकलुकणाऱ्या चांदण्या अन ग्रह

वाटती हिरे, मोती अन माणिक

सायंकाळी खुले खजीना

शृंगारुनी निघती चारही दिशा

पाहता देखणे रूप निसर्गाचे

प्रसन्न वाटे उदयाची उषा