आधुनिक ऋषी

 

केवळ आजपर्यंत ऐकल की

अमक्या ऋषीने केवळ एका घोटात समुद्र प्राषण केला

किंवा कुठल्या ऋषीने आपल्या हाडांची दिव्यास्त्रे, ब्रम्हास्त्रे केली

व कुठल्या ऋषीने घोर तपश्चर्या करून गंगा धरतीवर आणली

कदाचित असतील ते श्रेष्ठ, असेल त्यांच्यात ते धारिष्टय

पण मी शतवार नमन करेन त्यांना

कि ज्यांनी कुठली ही दिव्य ताकद वा कुठलेही सामर्थ्य

वा कुणाचा ही आशीर्वाद पाठीशी नसतांना

केवळ एक काठी व कंबरेला वितभर वस्त्र असतांना

परकियांविरुद्ध लढून, अस्पृश्य निर्मूलनासाठी आयुष्यभर झटून

करून परकीयांना देश सोडण्यास परावृत्त,

आप्तस्वकीयांना जातीभेदाच्या जोखडातून मुक्त्त,

ठेवून समोर जीवनाचा आदर्श,

शरीरावर बंदुकीच्या गोळ्या झेलून

झाले ते अमर साबरमतीचे संत डोळे मिटून

 

आकाशी धाडून वेगवेगळी याने

दाखविली जगास भारताची विज्ञान व तंत्रज्ञानाची शक्ती या पठ्ठ्याने

साऱ्या जगास भारताकडे आकृष्ठ करून

कमी खर्चात प्रगत देशांची धाडली उपग्रहे आकाशी

एकाच रॉकेट मध्ये बसवून एक खट्टयाने

साष्टांग नमन त्या ऋषिवराला

जो ख्यात झाला मिसाईल मॅनम्हणून

गावी किती ही महती त्या ऋषीतुल्याची

आहे तितकीच थोडी

जो गरिबीच्या, जातीभेदाच्या भेदक वातावरणातून निघून

आकाशी झेपावला भारताची आण्विक ताकद बनून

देऊन अपार ऊर्जा विज्ञान व तंत्रज्ञानाची

जो आकाशी विसावला ध्रुवताऱ्यागत अब्दुल कलाम बनून