जाती–धर्मान अन मंदिर–मस्जिदीच्या भांडणान
जगात सर्वात मागे राहिलो आपण
अस ऐकण्यात आहे की प्राचीन काळी
उच्चवर्णीयांनी दलितांवर अनन्वित अत्याचार केले
पण आता या आधुनिक युगात
भारतात राजकीय जातीभेद पाहतांना मिळतो
आरक्षणाच्या नावावर कुणाला भरगच्च सोयीसवलती
तर कुणाला हक्कांपासून वंचित केल जात
अन संविधानाला हरताळ फसल्या जात
इलेक्शन जाती–धर्मावर होत
उच्चवर्णीयांची जात निघते
अन कुणी दलितांची जात काढली तर ऍट्रॉसिटी लावली जाते
येथे माणसाला जातीच्या चष्म्यातून पाहिले जाते
आपल्या जातीचा असेल तर त्याला गोंजारले जाते
अन दुसऱ्या जातीचा असेल तर त्याच्यावर डोळे वटारले जाते
जातिगत शिक्षण संस्था, जातीनिहाय सहकारी बँका स्थापिल्या जातात
तर बहुसंख्यांकाचे देवालये सरकारी देखरेखीखाली असतात
अन अल्पसंख्यांकांच्या धर्मालयात तिथले खादिम वा पाद्री
देणग्यांची मलाई खात स्वतःचे घर भरत असतात
खूपच हास्यास्पद प्रकार आहे हा
असं असून ही प्रत्येकजण जातीचा चिखल तुडवून
स्वतःस धर्मनिरपेक्ष म्हणवत असतात