आधुनिक बाबा

जिकडे पहाव तिकडे साधु, संत अन बाबांचाच बाजार

मोठमोठाले मठ अन वातानुकूलित आश्रम

सोबत अत्याधुनिक मोटारी यात यांचा वावर

पेहेरावे यांचे मोठे आकर्षक, गुबगुबीत चेहरे

केसांना कलप, भूवया कोरलेल्या

ओठांना लाली अन चंदन टिळा भाली

 

हे करोडपती संत ओढती भक्तांना

सांगून पूर्वसंचित आपल्या जालात

दावूनि भय व्रतवैकल्याचे ओढती आपल्या पाशात

 

हे धनदांडगे संत उकळती रक्कमा मोठमोठ्या

करण्यास प्रवचने, यज्ञयाग अन संकिर्तने

करुनि प्रक्षोभक अन भीतीयुक्त भाषणे

गळी उतरविती जनसामान्यांच्या आपली उत्पादने

 

सुशिक्षित आम्ही जन, गराडा किड्यामुंग्या सम तयापुढे

देवून देवत्व त्या कःपुरुषाला

मूर्ख म्हणवूनी घेतो आपण आपल्याला