"आमच्या चॅनलला लाईक अन शेअर करा"

 

जेव्हा टी. व्ही., मोबाईल अथवा अन्य सोशल मिडियावर

साधूसंतांचे प्रवचन, त्यांच भविष्य वाचन, फेस रिडींग सांगण,

Signature वरून भविष्य वर्तवण, Tarrot Card वाल्या मुली, पत्ते पिसून,

वेगवेगळे Card काढून, make-up ने रंगविलेल्या चेहेऱ्यांनी

आपल्या गुबगुबीत, टपोऱ्या गालावर खळी पडून, हासून

मनुष्य प्राण्याचे, स्वतः चित्रगुप्ताचे बाप बनून, जेव्हा भाकीत वर्तवितात

तेव्हा तुम्ही एक गोष्ट Mark केली का, नाही ना ?

जरा डोळसपणे या महाविद्वानांकडे बघा !

अहो, त्यांच्याच मागेपुढे टेबलवर असतात

विविध देवीदेवतांच्या, ‘फेंगशुईअन लाफिंग बुद्धाच्यामुर्त्या,

दहा ही बोटात असतात वेगवेगळ्या राशीच्या खड्यांच्या

सोन्यात मढविलेल्या जाडजूड अंगठ्या

अन V.D.O. सुरु करण्याआधी हात जोडून, गयावया करून,

बेल आयकॉनला क्लिक करून आमच्या चॅनलला लाईक अन शेअर कराम्हणून

रडका चेहरा करून भीक ही मागतात

 

मित्र हो, खरच जर या भविष्यवेत्त्यांची भविष्यवाणी ऐकून

मानवाच्या जिंदगीत सुखसमृध्दि येत असती

तर सर्वात पहिले हेच सर्व भविष्यवेत्ते सुखी, समृध्द

अन जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले नसते का ?

कशाला त्यांना हे असले धंदे करून, खोटे एपिसोड बनवून

आमचे V.D.O. लाईक अन शेअर कराम्हणून

हात जोडून भीक मागावी लागली असती

 

मित्र हो, जरा विचार करा, अशा लोकांपासून सावध व्हा !

अति देव देव करू नका, प्रयत्नांवर विश्वास ठेवा,

प्रयत्नच माणसाला यशस्वी बनवितात

जागे व्हा, वेळेचा सदुपयोग करा,

जर तुम्ही नुसता देव देव करत बसला

अन ही नाटकी, खोटी भविष्यवाणी ऐकून

त्यावर विसंबून राहिला, तर लक्षात ठेवा

वेळ निघून जाताच, एक दिवस असा येईल की

मायबापावर अवलंबून राहून, हातात भिकेचा कटोरा घेऊन,

रस्त्यावर उभे राहून, डोक्यावर टोपी घालून, त्यावर मोठ्या अक्षरात लिहून

मी सुशिक्षित आहे, मला रोजगार द्या, माझ्या हाताला काम द्याम्हणून

माझे दुःख व वेदना लाईक अन शेअर कराअसे म्हणून

जनतेसमोर हात पसरून भीक मागावी लागेल