आम्हाला नकोय प्रगती

 

आम्हाला नकोय आमची

वा आमच्या देशाची प्रगती,

पाश्चात्य देशात असलेली

मानवीमूल्ये, ती सुबत्तता

ती विज्ञानदृष्टी व समृध्दी

 

आम्हाला अजून ही

दगडधोंडेच पुजायचे आहे,

निद्रिस्थ थडग्यास

सजदे करायचे आहेत,

धार्मिक अहंकारात जळून,

एकमेकांची घरे जाळून

होळपळायचे आहे

 

आम्हाला विदवत्ता नको

वा हुशार, विद्वान ही नको

आम्हाला दुसऱ्या कुणाच्या

हुशारीशी वा परिस्थितीशी

काहीही घेणदेण नाही

 

 

आम्हाला केवळ हव रिझर्व्हेशन

दिलेल्या लिमिटेड कोट्यातच

आम्हाला बसायचे आहे

त्या निकषांएवढेच मार्क मिळवून

एका ठिकाणी थांबायचे आहे,

पण त्याही पुढे निघून

आम्हाला पुढची ध्येय

गाठायची नाहीये

 

आम्हाला असच जगायच आहे

लाईनमध्ये लागून मरायच आहे

या देशात असच चालणारअस म्हणून

सिस्टमला शिव्या देत

आंधळ्याबहिऱ्यागत

मतदान करायला निघायच आहे