आम्ही भारतीय मोठे अंधश्रद्धाळू
किती ही शिकलो सवरलो तरी
बांधू दारावर लिंबू, मिर्च्या अन आलू
घेतली नवीन गाडी
तर तिच्या बॉनेटवर लावू फुलांचा हार,
इंजिनवर लावू कुंकवाचे बोटे चार
फोडून नारळ गाडीवर
उडवू नारळाच्या पाण्याचे सडे चहूकडे
घेतला कॉम्प्युटर तर त्याला वाहून हारफूले
स्क्रीनवर कुंकवाने काढू स्वस्तिकाचे चौकडे
व्वा रे ! भल्या माणसा
ही तर आहेत अत्याधुनिक यंत्रसाधने
सोडून चांगुलपणाचे वागणे
मृतदेहापरी सजवून, करून चांगल्या वस्तूचे मढे
त्या समोर लावून दिवे अन उदबत्त्या
का ठेवता मोदक, पेढ्यांचा प्रसाद पुढे
अरे आधुनिक विज्ञानाचा
मानवाच्या विकासासाठी करा उपयोग
शोधून नवीन संसाधने
मानवप्रगतीसाठी उघडा संशोधनाची नवी दालने