जरी असलो आम्ही शीख, इसाई, मुस्लिम वा हिंदू
वा असल्या आमच्या भाषा भिन्न
वा असले पांढरे, हिरवे, भगवे, चिन्ह
आहोत आम्ही सारे एक
या भारत भू वरचे भाऊबंधू
जरी असला भिन्न धर्म वा संप्रदाय
वा असला मंदिर–मस्जिदीचा वेगळा आब
वा असल्या वेगळ्या तऱ्हा प्रभूच्या इबादतीच्या
ज्यापरीस शोभे संगम बहुविध नदयांचा
नांदती बहुविध पंथे सोडून विषाक्त गाठा
बनून एकजात सुखदुःखात
उंचावती भारत भू चा माथा
ज्यापरिस पंचपक्वान्ने असली जरी वेगळी
वाढताच ताटात ती सर्व ही
चव येई तयास शर्करेसम गोडवी
विविधरंगी फुले जशी खुलती बागेत
वा बनून माळ शोभती फुलमाळेत
नांदती प्रभूची सर्व लेकरे
या स्वर्गादपि भारत भू च्या कुशीत
कुणी ही देवो कसली ही आमिषे
वा पसरवो जातीयतेची विषवल्ली
वा करी कृद्ध जनमत ईतर धर्मापरी
आहोत आम्ही बुध्दिमंत
थारा नसे आम्हापाशी तयासाठी
आहोत आम्ही भारतीय, धर्म आमचा भारत
सांगतो हे सर्व जगा, दृढ निक्षूण