आयुष्याच रहस्य

 

जर नशिबान साथ दिली

तर मी अस करल

खूप पैसे कमवून

थोडे बहुत जमवून

शानिन राहून

सुखा समाधानान जगल

 

जर नशिबान साथ दिली

तर समाजासाठी झटल

लोकांची सेवा करल

गरजवंताला मदतीचा हात देऊन

त्यांना तारल

 

जर नशिबान साथ दिली

तर बेरोजगारांना उपलब्ध करून देईल रोजगार

करून त्यांचे भविष्य उज्वल

दूर करल त्यांच्या आयुष्याचा अंधार

 

जर नशिबान साथ दिली

तर मी अस करल

मी तस करल

सगळ्या नकर्त्याच्या गोष्टी

 

लोकांच भल करण्यासाठी

हवी कशाला नशिबाची साथ

जर असेल मनगटात जोर अन निर्धार

तर कशास हव नशीब अन भविष्य

जाईल तोच पुढे

ज्यास समजल हे आयुष्याच रहस्य