न फिराव लागेल वणवण
न झिजावे लागतील चप्पल–जोडे
विवाह जुळतील न लागता नेट
अहो राव आले इंटरनेट
विज्ञानाच्या शोधात नवी भर एक
अहो आले इंटरनेट
दोघांचीही आवड–निवड सांगेल तो सार
जुळतील दोन मनांच्या तार
ना हुंड्याची बिषाद ना दिखाऊ झगमगाट
हि तर नव्या युगाची नवी पहाट
रूढी परंपरेच्या डोक्यावरन
जाऊ दयाव आधुनिकतेच वार
कुंडली, पत्रिका अन मंगळाचा घोर
अनिष्ठ प्रथा हया साऱ्या सरतील भराभर
सारी मोह–माया त्यागून करावा संसार
हेच तर खरे सुखी संसाराचे सार