डॉक्टर, वकील, इंजिनिअर वा इतर उच्चशिक्षित
असतात यांच्या दालनात मोठ्या दिमाखात
कुठे समोर तर कुठे पाठीमागे
वा कुठे दिशेच सोवळ सांभाळून
झगमग लायटिंग केलेल्या लाकडी देव्हाऱ्यात
वा चांदीच्या पत्र्याने मढविलेल्या पाटावर
डौलात विराजमान नानाविध देवीदेवता,
पोथी–पुराणातील संत वा स्वयंघोषित महंत यांच्या तसबिरी
या उच्चशिक्षितांची ही फार अपेक्षा त्यांच्याकडून
आला अशील की मिळावा भरगच्च माल भरून
तसाच साधा सुशिक्षित मुशाफ़िर तो ही
ठेवून श्रद्धा मनी मागतो यास भरपूर काही
देव मोठा छाकटा, साधतो समतोल दोघांवर ही सारखा
येता रोगी दवाखान्यात, वाढवितो डॉक्टरची बिदागी
तिकडे रोग्यालाही देतो जीव वाचल्याचे समाधान
अन दोघांनाही स्वतःसमोर नतमस्तक व्हावयास
गोडीगुलाबीने घेतो लबाडी करून छान
वर खातो दोघांकडून ही प्रसाद, बनवून तयास हताश
भगवंता तू ही काय करशील
जाणतोस तू भक्ती अन दांभिकतेतल अंतर
वागून त्यांच्याशी तशास तस, तू ही देतोस मंतर