उत्सवाचे स्वरूप

 

आता उत्सवाचे स्वरूप ही बदलले

आधी एका साध्या मंडपात

कुण्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून

आकर्षक रौशनाई सवे समाजसुधारकांच्या कार्याच्या गौरवाचे,

देवीदेवतांच्या हस्ते राक्षसांच्या मर्दनाचे देखावे करून

शास्त्रीय नृत्य, वक्तृत्व स्पर्धेचे कार्यक्रम व्हायचे

मंगलवादयासंगे भक्ती संगीत आळवायचे

काळ बदलला, वेळ बदलली, उत्सवाचे स्वरूप ही बदलले

मुर्त्या मंडपात मावेनाश्या झाल्या, उंच्या त्यांच्या गगनी भिडल्या

देखाव्यांच्या जागा डिजिटल जाहिरातींच्या झगमगाटाने घेतल्या

जो तो बिभित्स, उत्तान गाण्यावर नाचत सुटला

मिरवणुकीचे स्वरूप ही पालटले,

टाळ, मृदंगाच्या तालावर, डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन जाणारे भक्त्त

अन झेलिम करणारे पथक ही लोपले

 

 

आता श्रीराम मानवी अवतारात येऊन चेहरा रंगवून, कारमध्ये बसून,

हाती तीरकमटा घेऊन रावणाच्या पुतळ्याचे दहन करतो

तर हनुमान जयंतीला कोणी हनुमानाचे भलेमोठे सोंग घेऊन

कंपनीच्या लोगोच्या बाहुल्यागत रस्त्याने लोकांना शेकहॅण्ड करत चालतो,

महाशिवरात्रीला कोणी भगवान शंकराचे सोंग घेऊन

आपल्या जटेतून पाण्याची धार सोडतो

तर कुणी नवरात्रीला देवीचा वेश धारण करून,

विड्याच्या पानाने रंगविलेली लाल जीभ वारंवार बाहेर काढून

हातातील त्रिशूल खालीवर करत लोकांच मनोरंजन करतो

 

हीच काय हो आपली आस्था देवाविषयी

जो देव आपल्या मनमंदिरात पाहिजे

त्याला सोंगाड्या बनवून रस्त्यावर आणतो

कचकळ्याच्या बाहुल्यागत बोटांवर नाचवून

त्याच्याकडून विदुषकी खेळ करून घेतो

जर आपणच आपल्या देवाचे हसे करू,

त्याचे पावित्र्य नष्ट करू,

तर कोण कसे आपल्या देवांकडे आदराने पाहणार

आपला खुळचटपणा पाहून ते ही चेष्ठेने वेडेवाकडे बोलणार

 

मित्र हो, असे नका वागू ,

करा आपल्या देवीदेवतांचा, संतसाहित्याचा आदर

त्यांची सोंगे रंगवून नका करू त्यांचा अनादर

त्यांना पालकीत बसवून, नामस्मरणात दंगून, व्हा मंत्रमुग्ध

जेव्हा राखू देवाचे पावित्र्य, बाळगू त्याविषयी निष्ठा

तेव्हाच कोणी उद्दगारणार नाही आपल्या देवाबदद्ल निंदाकारक शब्द