आपण कुणी रस्ता विचारला असता सांगतो
“त्या समोरच्या हनुमान मंदिराच्या गल्लीतून जा
किंवा समोर पुढे जाताच तुम्हाला मस्जिद दिसेल
तेथून पुढे जा व डाव्या हातावर वळा अगदी दर्ग्याच्या समोरच आहे“
आपला मित्र रामची भेट झाली नाही तर रहीम म्हणतो
“अरे आज राम नाही दिख रहा कहा गया” किंवा
रहिमची भेट झाली नाही तर राम म्हणतो
“अरे रहीम का आला नाही रे तब्बेत–बिब्बेत तर ठीक आहे ना ?
वेगवेगळ्या जातिसमाजाच्या लोकांशी आपली नाळ जुळली आहे
संकटात मुस्लिम रिक्षेवाला कुण्या ख्रिश्चन व्यक्तीला
आपल्या ऑटोत दवाखान्यात घेऊन जातो
तर कुणी हिंदू व्यक्ती एकटी मुस्लिम मुलगी रस्त्यात दिसताच
पटकन आपली गाडी थांबवून तिला तिच्या घरी पोहचवून देऊ का ? म्हणतो
मित्र हो खरेच कुणाच्या हृदयात द्वेष असता
तर अशी माणुसकी कुणी दाखविली असती का ?
कुणी कुणासाठी धावून आल असत का ?
समाजात तेढ माजविण्याची काही लोकांची आहे खेळी
हेच जर आपण समजलो
तर जातिद्वेषाच्या वणव्यात नाहक जाणार नाही कुणाचा बळी