कमर्शियल देव

 

जग मोठ कमर्शियल झाल आहे

कुठल्याही मंदिरमस्जिद नाही तर चर्चमध्ये जा

आधी प्रसाद, फुल, फळ विकणाऱ्या दुकानांचेच दर्शन होते

धर्मालयात जाण्याचा रस्ताच दिसत नाही

दुकानांच्या ओळीतून विचारत विचारत लांबच लांब चालल्यानंतर

कुठे एका गल्लीनुमा बोळीतून धर्मालयाकडे जाणारा रस्ता दिसतो

पण त्या ठिकाणी कुठेही धर्मालयाकडे कुठून जावे

म्हणून फलक लावलेला नसतो

 

यावरून तरी असे दिसते पैसाच देव झाला आहे

देवळातल्या देवाला साधन केले आहे

आधी बाहेरच्या दुकानांना भेट दया,

तिथे पैसे खर्च करा अन अंगात त्राण उरले तर

धर्मालयाबाहेर लांबच लांब रांगेत उभे राहून,

तिथल्या सेवेकऱ्यांचे दोन अपशब्द ऐकून,

दर्शन करण्याकरिता हात जोडताच

गाभाऱ्यात असलेल्या पोलिसांनी बाहेर ढकलत

दर्शन केल्याचा आव आणत कसेबसे बाहेर या

 

जेव्हा हे अनुभवतो, वाटते देवा तू फोटो अन तसविरीतच छान शोभतो

त्यातूनच तू भक्तांकडे करुणेने पाहतो

मात्र तुझ्या धर्मस्थळी येताच तू रागे भरतो

अन जागोजागी अपमानित करतो