T.V., मोबाईलवर आपण सर्वधर्मीयांच्या प्रवचनकारांकडून
सदैव ऐकले असेल की –
“संध्याकाळी बाहेर कपडे वाळावयास घालू नये किंवा धुवू नये“
त्याच कारण ते अस ही सांगतात की –
“संध्याकाळी कपडे बाहेर वाळत घातल्याने त्यात दृष्टशक्ती वास करतात,
घरात भुताखेतांचा प्रवेश होतो व आपल्याला भूतबाधा होते“
आणि आपण त्यांच म्हणन आंधळ्यागत follow ही करतो
पण मित्र हो कधी थोडा तरी विचार केला आहे का
“खरेच रात्री बाहेर कपडे वाळू घातल्याने त्या कपड्यात
भुताखेतांचा वावर होत असावा का ?
कारण आता आपण २१ व्या शतकात, कॉम्प्युटरच्या युगात, वावरतो आहे
आपल्या देशाने परग्रहांवर अवकाशयाने धाडली आहेत,
आपण विज्ञान व तंत्रज्ञानाने समृध्द झालो आहोत
अन अशा गोष्टींना थारा देतो आहे
आजच स्पर्धेच युग आहे, स्त्री व पुरुष दोघेही नौकरी करतात
सकाळी जातात व संध्याकाळीच कामावरून परत येतात
मग त्यांना घरकाम करण्यास वेळ कधी मिळणार ?
साहजिकच आहे त्यांना घरकामे
संध्याकाळी कामावरून आल्यावरच करावे लागणार
म्हणूनच काय तुम्ही त्यांच्याकडे तोंड वाकडे करून,
यांना अक्कल नाही, हे कधी ही कसे ही वागतात, म्हणून नावे ठेवाल काय ?
अहो मी तर म्हणतो या अशा काम करण्याऱ्या व्यक्तिंच्या घरी
असे रात्री कपडे धुतल्याने कधीच भूतप्रेतांचा संचार होत नाही
बल्की दोघे मिळून काम केल्याने घरात सुखसमृध्दी नांदून,
नवरा–बायकोत प्रेम वृद्धिंगत होऊन, कर्ज, दारिद्र्याचा नाश होतो
अन जे हया अशा खुळचट समजुतींना खतपाणी घालतात
त्यांच्या घरी सदैव भांडणे, कटकट्या असतात
अन त्यांची मुले माय–बापाच्या भरवश्यावर खाऊन,
काहीही कामधंदा न करता, पानठेल्यावर खर्रे खात असतांना दिसतात
थोडक्यात, जो अति कर्मकांडाच्या आहारी जातो
त्याच्या घरात सदैव कर्ज अन दारिद्र्य देवतेचा वास असतो
म्हणून मित्र हो खुळचट समजुती सोडा, काळानुसार वागा,
कर्मकांड कुणावर थोपवू नका,
कुणाला तो कसा वागतो म्हणून नावे ठेवू नका,
परिस्थितीनुसार बदला
कारण, “वक्त करवट बदल रहा है” हे ध्यानात ठेवा