कर्माची गती

 

कर्माची गती पहा कशी न्यारी महाराजा

ज्याने आयुष्यभर लोकांना त्रास दिला

तो अखेरच्या क्षणी सडून मेला

ज्या पोटच्या गोळ्यासाठी जमवला डबोला

तो पाणी पाजण्यासाठी ही नाही आला

आयुष्यभर ज्यांच्या अंगावर खेकसला

त्यांनीच मरून देव झालाम्हणून खांदा दिला

हडपून लोकांची संपत्ती, जमवून गडगंज

रित्या हाताने बेवारस सोडून गेला

बर झाल शेजारची घाण गेलीअशी

दुखावलेल्या लोकांची बददुवा घेऊन गेला

चुकांवर पांघरून घालून लेकरांना कुरवाळला

शेवटच्या क्षणी निपुत्रिकासारखा निवर्तला

 

करा चांगले होईल चांगले, वाईट वागू नका

हिंस्र बनून जनावरासारखे जगू नका