कलियुगाचा महिमा

 

कलियुगाचा महिमाच फार वेगळा

येथे खोटे बोलणाऱ्यांची होते जीत

अन सत्यवान होतो चारीमुंड्या चीत

 

केवळ दाढी मिश्या वाढवून

होतो येथे कुणीही संत

वा घालून डिझायनर पोशाख

व करून भडक मेकअप

होतो महंत वा संन्यासिनी

देऊन देवीदेवतांचा लुकअप

प्रवचनाच्या नावाखाली

करती हे गोरखधंदे

कुणी स्थापिती उद्योगधंदे

तर कुणी करती अश्लील धंदे

 

इथले संत संन्यासिनी राहतात पंचतारांकित आश्रमात

व फिरतात वातानुकूलित गाड्यात

फुटू नये आपले बिंग वा होऊ नये आपले स्टिंग

म्हणून वावरतात खाजगी सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात

 

ऐसा कलियुग आयेगा …….. “

दिसतात खऱ्या होतांना हया गाण्याच्या ओळी

भोळ्या भाबड्या भक्तांच्या डोक्यावर

देऊन पापपुण्याची मोळी

हे दुराचारी भरती आपली झोळी