कशास पुजू देवी-देवतांना

 

मी कशास पुजू देवीदेवतांना

का वाहू हारतुरे तयांना

का देऊ भेटी त्यांच्या मठांना वा गिरिजाघरांना

अरे ज्यांना मी कधीच स्वदेहे पाहिले नाही

व जे लोककल्याणार्थ कधी भूतलावर राहिले नाही

ते कसे दिसतात त्यांच्याबद्द्ल आहे केवळ कल्पनाच

केवळ स्वार्थ साधण्या काही मूठभर लोकांनी

वारेमाप स्तुतीसुमने गाऊन व तिखट, मीठ लावून

ज्यांच्या औदार्याच्या भाराभार चिट्ठ्याचपाट्या लिहून

ज्यांना तसबिरीत, पुतळ्यात भरजरी वस्त्रे लेवून बंदिस्त केल

अरे त्यापरीस मी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, सावित्रीबाई फुले,

संत गाडगेबाबा, शिवाजी महाराज यांना वाहीन हारतुरे व पडेल सजदे

व गायिल त्यांच्या कर्तृत्वाचे कशिदे

त्यांना स्वदेहे मी पाहिले आहे

त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख जगन्मान्य, लोकाभिमुख आहे

ते लोककल्याणार्थ झटले व कुठलाच गवगवा न करता,

लोकसेवा करता करता प्रसंगी दगडधोंडे व दंडुक्यांचा मार खाऊन

आपल्या प्राणास मुकले

 

अरे हेच तर खरे देव अन संत

ज्यांना लोकांनी पाहिले व त्यांना अनुभवून त्यांचे चरित्र लिहिले

त्यांना मी स्वहृदये वाहीन हारतुरे

उभारीन त्यांच्या स्मृतीत वाचनालये, दवाखाने,

शाळा, प्रयोगशाळा, स्मृतिउद्याने व गरिबांकरिता घरे

कि ज्यापासून मिळून त्यांच्या कार्याची प्रेरणा

त्या महामानवांची स्मृती सदैव हृदयी उरे