जेष्ठ नागरिकांच्या तोंडून एक वाक्य नेहमी ऐकायला कानी पडत
“किती जमाना बदलला बघा, कोणाला कोणाशी घेण–देण नाही
आता माणसाला भेटायलाही अपॉइंटमेंट घ्यावी लागते ?”
त्यांच बोलण चुकीच नाही, परंतु ही पूर्वापार पासून चालत आलेली रीत आहे
वैदिक काळात ऋषीमुनींनाही जंगलात युगानुयुगे तपश्चर्या केल्यावर
कुठे देव प्रसन्न होऊन, काही क्षणापुरता प्रगट होऊन,
इच्छित वर देऊन, अंतर्धान पावत असे
तेव्हा त्यांना ही देवाची वाट पाहावी लागे
आता वेळ बदलली, लोकांच्या गरजा बदलल्या
अपेक्षा वाढून लालसा वाढली
आता सामान्य माणूस अधिकारी, मंत्र्यांच्या ऑफिसच्या चकरा मारतो
व कशीबशी त्यांची अपॉइंटमेंट घेऊन आपले काम मार्गी लावतो,
बदलल काहीच नाही फक्त पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे
आधी देवाकडून वर मागण्यासाठी त्याची अपॉइंटमेंट घेण्यासाठी
वर्षानुवर्षे तप करावे लागायचे, अन आता
ऑफिसच्या, नेत्यांच्या, अधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या चकरा मारून
आपल्या समस्येचे निराकरण करावे लागते
शेवटी, “कालाय तस्मै नमः” एवढच ते काय ?