"काला अक्षर भैस बराबर"

 

माणूस फक्त पोथ्यापुराणे वाचून त्यातील अक्षरे वाचण्यास शिकला

पण त्यातील शब्दांचा अर्थ त्यास न कळला

तो फक्त जोरजोराने शोबाजी करत पोथ्या वाचतो

अन सोवळ नेसून स्वतःस पवित्र समजून, वेगळ राहून,

इतरांस दूर लोटतो

त्यात लिहिलेल्या जमानाभराच्या कुप्रथा डोळे झाकून पाळतो

व स्वतःस हरीचा दास समजून इतरांस तुच्छ लेखतो

 

दगडधोंड्याच्या देवाला पंचामृतान धुतो

देव पंचपक्वान्न खात नाही तरी

त्यास पहिले गरमागरम नैवेद्य म्हणून खायला देतो

अन आपल्याच सारख्या हाडामासाच्या माणसांना

उपाशी ठेवून अन्नाच्या एकेका कणासाठी तरसवतो

 

त्याला धर्मातल्या कुप्रथा, अंधश्रद्धा मान्य आहेत

पण त्यातल्या चांगल्या गोष्टी निंदनीय आहेत

पोथीपुराणातले फक्त वंदनीयच अंगिकारले पाहिजे

हे त्याला ठाऊक नाही

केवळ अक्षर ओळख आहे पण त्याचा मतितार्थ गावत नाही

 

ही माणस नाहीत तर ही आहेत जनावर

यांच्यासाठी काला अक्षर भैस बराबर