का ? जाती-धर्मात भांडणे

 

आपण घेतो ज्ञान विविध धर्माच्या शिक्षकांकडून

जातो पुढे त्याचे बोट पकडून,

हुशार आहे डॉक्टर म्हणून न पाहता त्याचा धर्म

इलाज रोगाचा करतो त्याच्या कडून,

विद्वान वकिलास ही सुपूर्द करून महत्वाची कागदपत्रे

मिळविण्या न्याय जातो त्याच्याकडे, धर्मावर त्याच्या फुली मारून

 

जाता बाजारात वेगवेगळ्या धर्मियांच्या दुकानातून घेऊ

दैनंदिन जीवनाला लागणारे साहित्य,

विविध धर्मियांच्या दुकानातून घेतो देवीदेवतांच्या मुर्त्या,

हार फुले, धूप दीप, कापूर करण्या पौरोहित्य

जात असू आपण कोणाच्या ही अंगणातून, मोहल्ल्यातून

न पाहता त्याची जातधर्म, करण्या अपुले कर्म नित्य

 

असे हे अपुले गुण्यागोविंदाने राहणे, वागणे सर्वांशी सलोख्याने

शिकवण अपुली माणुसकीलाच खरा धर्म समजणे

का मग? जातीधर्मात भांडणे, एकमेकांची गळे कापणे,

कोणी रस्त्यात नमाज पढता, गल्लोगल्ली महाआरती करणे,

सोशल मीडियावर पोस्ट टाकून कुणाच्या देवाला नावे ठेवणे

तर कुठे बळजबरी धर्मांतरण करणे, यातल खरखोट भगवंता तूच जाणे