कुठे ही कचरा फेकू नका

 

मित्र हो, जसे आपण जाता मंदिरमस्जिदी वा कुठल्याही धर्मालयी

तेथे त्या जागेचे पावित्र्य राखतो, तेथे पडलेला कचरा पटकन उचलून कुंडीत टाकतो,

रांगेत कुणी म्हातारा असता त्यास आपण पुढे जाऊ देतो,

हळूहळू नामस्मरण करीत कुणास आपला धक्का लागता कामा नये

याची काळजी घेत दर्शन घेतो, स्वतः झाडू घेऊन तो परिसर झाडून काढतो,

तेथील कर्मचाऱ्यास पंगत वाढण्यास मदत करतो,

देवाजवळचे, मजारीजवळचे फुल, उदबत्या उचलून निर्माल्याच्या जागी टाकतो

हे कार्य धर्मालयाच्या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने

किंवा, नाही तर देव आपल्याला पाप देईल, या भीतीने करतो

 

अन बाहेर जगात वावरतांना रस्त्यावर दुचाकीवरून, गाडीतून

लोकांच्या अंगावर शिंतोडे उडतील असे काय थुंकतो,

खादय पदार्थ रस्त्यावर काय फेकतो,

साध्या साध्या गोष्टीसाठी काय भांडतो, शिवीगाळ करतो

तेव्हा जणू आपण स्वतःस साऱ्या कायनातीचे मालकच समजतो

 

दोस्तो हो, देवाला राग येऊन तो पाप देईल की नाही हे तर मला माहित नाही

कारण हा ही एक मोठा सवाल आहे

पण एवढ मात्र नक्की

रस्त्यावर घाण केल्याने शहरात रोगांचे साम्राज्य नक्कीच वाढेल,

साध्या साध्या गोष्टीसाठी भांडल्याने, शिवीगाळ केल्याने

कुणाच्या दुःखी आत्म्याचे तरी तळतळाट तुम्ही याच जन्मी भोगाल

अन असेच सदैव मंदिरमस्जिदीच्या पायऱ्या चढत

आमच्यावरच संकट टळू देम्हणून रडत जगाल

 

म्हणून मित्र हो, मायबाप हो, हात जोडून विनंती तुम्हाला

जशी धर्मालयी स्वच्छता ठेवता, तिथे स्वतःहून Social Worker, Sweeper बनता

तसेच आपले, गाव, शहर, जग पवित्र वास्तू समजून

नका कुठे ही घाण टाकू, कुठे ही थुंकू

प्रत्येकाशी आपुलकीने बोला, इच्छा नसेल तर त्याचा पिच्छा सोडा,

जरा चहूकडे बघा, आपल्या बाजूला दर दोन मिनिटाच्या अंतरावर दिसेल

छोटे मंदिर, मस्जिद, चॅपल

अहो घाण उडेल तिथे, मग असा का रस्त्यावर कचरा फेकता ?