हृदय मोठ पिळून येते हो ! जेव्हा काही स्वार्थी लोक आपल्या शुल्लक स्वार्थासाठी
रामायण, महाभारत, कुराण, बायबलच्या देवतुल्य व्यक्तिरेखांबद्दल
खाल पाडून बोलून, त्यांचा अपमान करतात
अन समाजामध्ये उद्रेक घडवून, शहरेच्या शहरे बेचिराख करून,
देवधर्माच्या नावावर कुणाचे मुंडके छाटतात
मित्र हो, खरेच आपण सुशिक्षित झालो आहोत का हो ?
कारण आपण सुशिक्षित असतो तर आपल्याला
आपला अन परक्यांचा देवधर्म समजला असता, त्याबद्दल आदर असता
अन अस कोणी आपल्या अन परक्यांच्या देवधर्माबद्दल बोलल असत तर
कुणाच्याही देवाविरुद्ध अपशब्द काढणाऱ्या व्यक्तीवर
आपण स्वतःहून पुढाकार घेऊन, कायदेशीर कारवाई करून,
अशा समाजकंटकाला चांगला धडा शिकविला असता
आपण फक्त कागदावरच सुशिक्षित आहोत
कोणी माथेफिरू येतो अन दोन समाजात भांडणे लावून
दोघांच्या भांडणात “माकडासारखा” तिसऱ्याचा लाभ करून जातो
मित्र हो प्रत्येक जातीच्या, समाजाच्या देवधर्माचा मान राखा
सगळ्याच जातीधर्माचे धर्मग्रंथ अन त्यातल्या देवतुल्य व्यक्तिरेखा ह्या सर्वश्रेष्ठ आहेत
कोणाला कमी लेखू नका