कुणाला देव म्हणाव
हा प्रश्नच पडला ?
शनी, सूर्याचा राग करतो,
मंगळ, बुधाला पारा करून वितळवितो
तर चंद्र, सूर्याला पाण्यात पाहतो
अन यांच्या भांडणांना कंटाळून
गुरु अस्तंगत राहतो
एवढेच नव्हे, हे मोठे कपटी
कोणी मृगाच रूप घेवून
सीतेच हरण करतो,
इंद्र कुणाच्या पत्नीवर भाळून,
साधूच रूप घेऊन, तिच्यावर अतिप्रसंग करतो
तर काही सिनियर देव
डोळे बंद करून द्रौपदीच्या चीरहरणाची मजा घेतो
अन सूर्यदेव वरदानाच्या नावाखाली
कुंतीसारख्या कुमारिकेला गर्भार करून
जगाच्या ठोकरा खायला सोडून देतो
बरे, हे ही मोठे विलासी
कोणी स्मशानात तांडव करते,
तर कोणी शेषनागावर झोपून
बेंबीतल्या कमळाचा वास घेते
तर कोणी बासरी वाजवून
गोपिकेला आपल्या नादी लावते,
तर कोणी पुष्पक विमानात बसून
सार जग पालथ घालते
अरे यांच्यातच षडरिपू आहेत
हे काय करतील कुणाच भल
त्या परीस हेच बर
मनात असलेल्या यांच्या आकृत्यांचे,
कथा, काव्य, पोथ्यांच्या अस्थींचे
गंगेत विसर्जन करून दिल
विज्ञानाची, तंत्रज्ञानाची, अवजारांची करा पूजा
वहा त्यास गंध, अक्षता अन फुल