मला हे समजत नाही जेव्हा तथाकथित air-conditioner मध्ये बसणारे
साधू–संत, मुल्ला–मौलवी, पादरी त्यांच्या प्रवचनातून
“मंदिर–मस्जिद, चर्च बांधण्याकरिता, त्यांच्या जीर्णोद्धाराकरिता
सढळ हाताने मदत करा म्हणून” याचना करतात
तेव्हा समोर बसलेली, त्यांच प्रवचन बिनढोकासारखे,
डोक घरी ठेवून आल्यासारखी ऐकत असलेली,
त्यांच म्हणन शिरसावंध्य मानून हजारो, लाखो रुपयांचे दान देते
पण खरेच त्या पैशाचा सद्उपयोग होतो कि नाही ते न पाहते
ही प्रवचनकार मंडळी धृतराष्ट्रासारखी
पैशाच्या मोहासाठी, सुखासाठी स्वार्थात आंधळी झाली असते
लोकांनी दान म्हणून दिलेला पैसा विदेशात स्वतःच्या खात्यात जमा करून
जनता मुर्खासारखी त्यांना आंधळेपणाने दान देत असल्याने
ही स्वार्थी बाबा मंडळी वारंवार दान करण्यासाठी त्यांना
देवाच्या, धर्माच्या नावावर भडकवून पैसा उकळत असते
मित्र हो तुम्हाला ज्यांना दान दयायच आहे ते द्या
पण त्या करिता उगीचच कुणाला बाध्य करू नका
कुणा साधू–संत, मुल्ला–मौलवी, पाद्रीच्या प्रवचनातून
“मंदिर–मस्जिद, चर्चसाठी दान दया” म्हणून भीक मागू नका
त्यासाठी स्वतःच्या प्रॉपर्ट्या विका
किंवा बँकेतून, सावकाराकडून कर्ज काढून
जितक दान दयायच ते स्वतः द्या
अन मग पहा कसे त्या कर्जाचे हप्ते फेडता फेडता नाकी नऊ येतात ते
किंवा मंदिर–मस्जिद, चर्च बांधण्याची परवानगी घेण्यासाठी,
तिथे इलेक्ट्रिक मीटर घेण्यासाठी किती हेलपाट्या घ्याव्या लागतात ते
जेव्हा तुम्ही स्वतः व्यक्तिगत रूपाने त्यातून जाल
अन कर्जाचे हप्ते भरता भरता कंगाल व्हाल
तेव्हा कळेल पैशाचे महत्व
मित्र हो डोळस बना, कोणत्याच मंदिर–मस्जिद, चर्चला दान देऊ नका
आपल्या देशात पाऊलोगिणती मंदिर–मस्जिद, चर्च आहेत
आता आपल्याला त्याची गरज नाही
उगीचच त्यासाठी जागा अडकवून रहदारीस खोळंबा करू नका
त्यापरीस आपल्या माय–बापाच्या नावान शाळा, दवाखाने बांधा
सुशिक्षित,निरोगी पिढी घडवून पुण्य पदरात पाडा