कोण म्हंणते

कोण म्हंणते, समाजात स्त्रीला चांगल वागवीले जाते

तर का मग ?

जगदंबा, भवानी, महामाया ह्या देव्याईच्या नावान

तिला हिणवल जाते ।

 

कोण म्हंणते, समाजात स्त्रीकडे चांगल पाहिल जाते

तर का मग ?

तिला सती धाडून, तिच्या चितेवर मंदिर बांधून

तिला पुण्यवंत म्हणून समाजात नागविले जाते ।

 

 

कसा हा मुर्दाड समाज

घरची लक्ष्मी आहे म्हंणते ती

तर का मग ?

तिला नवसाला देवदासी म्हणून सोडून देते ।

 

बोहल्यावर चढल्यावर हवनासमोर सप्तपदीत

होमात तूप टाकू टाकू घेतो शपथाच शपथा

तर का मग ?

तिला सासरी चपलेन बडविल जाते ।

 

तर कोण म्हंणते, स्त्रीच स्त्रीकडे चांगली पाहते

तर का मग ?

एकमेकिंच्या चुगल्या करून, झिंग्या उपटून,

शिव्या देऊन, बाजार बसवी, रांड म्हणून पुकारल्या जाते ।

 

बिनपेंद्याच्या लोट्या सारखा समाज हा

जगदंबा, भवानी, महामाया ह्या देव्याईला

एकीकडे मनोभावे पुजते, अन दूसरीकडे

घरच्याच लक्ष्मीला ह्यांच्या नावान खिजवते ।

 

कोण म्हंणते, समाजात स्त्रीला चांगले वागवीले जाते

तर का मग तिला गुराढोरां प्रमाणे बेदम मारल जाते ।