गंगा नदी "निर्भया" होऊ लागली आहे

 

म्हणे आपल्या देशात लोक पाप करण्याला भितात

अस असत तर पवित्र नदयाअमंगळ झाल्याच नसत्या

 

लोकांचे पाप धुण्याने गंगा नदी मैलीझाली,

त्यात होणाऱ्या अस्थिविसर्जनामुळे,

मृतदेहावरचे निर्माल्य त्यात सोडल्यामुळे ती घाण झाली,

तिच्या पाण्याला दुर्गंधी आली

बाकी पवित्र नदया, तिच्या पात्रात वेगवेगळे घाटअन मंदिरेबांधल्यामुळे

आटू लागली, कृश दिसू लागली

 

आपण फक्त डोक्यावर तुळशीचे रोप घेऊन, मुखाने नामस्मरण करून,

नदी तीरावर चांगल्या तुपाचे दिवे जाळून तिची विधिवत पूजा करतो

अन अंगावरची घाण निघेपर्यंत नदीतच अंग घासत बसतो,

अंगवस्त्रे नदीतच सोडून दिगंबरावस्थेत

हर हर गंगेअसा वारंवार जोराने एकेरी उल्लेख करत

एकप्रकारे गंगेला दमदाटी करत नाक दाबूनपाण्यात डुबकी मारतो

 

आता मानवाचे पापचइतके झाले आहेत की

गंगा नदीही मनुष्य दिसल्यावर घाबरू लागली आहे

तिला आता या धरतीवर वाचविणारा कोणी नाही

हि शंका सतावू लागली आहे

ब्रह्मदेवस्वर्गात आहेत अन भगवान शंकरानेही 

केव्हाच तिला आपल्या जटेतून सोडून 

तिचा त्याग केला आहे

 

देवांनीच तर तिला वाऱ्यावर सोडल आहे ! मग तिथे हे मानव कोण हे जाणून

मानवाचा सततचा तिच्यावर होत असलेला अत्याचार पाहून

पापी नराधमांच्या तिच्या पाण्यात आस्था की डुबकीमारून

तिला नखशिखांत अंगाखांद्यावर घेऊन, हेळसांड करण्याने

ती ही काळवंडून निर्भयाहोऊ लागली आहे