गरिबांचा दाता

 

मी तर भगवंताबदद्ल ऐकल

आहे तो गरिबांचा दाता,

सत्याची कास धरणारा,

पाप्याचे मुंडके क्षणात छाटणारा

 

पण खरच आहे का हो तो तसा ?

कारण जेव्हा पाहतो जगात धनदांडग्यांची मस्ती,

त्यांचे ते उद्दाम, बेफाम वागणे,

देशघातकी कृत्ये करणे, माणसे अन दुर्मिळ जनावरे मारणे

यावरून तरी वाटत नाही असेल तो तसा

 

कारण हे नराधम केल्यावर दुष्कृत्य

करतात त्याच देवाच्या वाऱ्या,

होमहवने, मस्तकावर गंधाक्षतांचा मोठा टिळा,

हातात ग्रहांच्या अंगठ्या अन गळ्यात रुद्राक्षाच्या माळा

बरे, हा देव त्यांचे ऐकतो ही

अन त्यांना त्यांच्या पापातून सहीसलामत मुक्त्त करतो ही

मरतो सामान्य गरीब माणूस बिचारा

 

देवाचे ही बरोबर आहे

या धनदांडग्यांच्या येण्याने होते देवाचे ही नाव,

वाढते त्याचे प्रस्थ, मिळते त्यास दक्षिणा भरगच्च,

मिळून ग्लॅमर वाढते नावलौकिक देवाचा

म्हणून तर हा झुकत माप देतो तयांना

 

अहो सामान्य माणसाला ओळखतच कोण

अन त्याच्या दिडदमडीच मोलच काय

मला तरी वाटते देव काही गरीबाचा नाय

तो तर काही दुसराच व्यक्ती आहे हायफाय