वाटल शिकून सवरून मनुष्य अडाणीपणा सोडून देईल
पण सुशिक्षितांची प्रसारमाध्यमांवर दिसणारी अंधश्रद्धा पाहून राग अनावर होतो
व वाटते, ही मंडळी खरेच पुस्तके वाचून शिकली की कॉप्या करून पास झाली
प्रसारमाध्यमांवर एक उच्च शिक्षित घड्याळीसंमंधी शकुन–अपशकुन सांगत होता
ऐकून नवलच वाटले
अहो घड्याळीला ही शकुन–अपशकुन असतात का हो ?
जी घड्याळ आपल्याला उदयाची चांगली वेळ दर्शविते
तिला ही आपण अंधश्रद्धेच्या खाईत लोटतो
तो उच्च शिक्षित प्रसारमाध्यमांवर आपल्या A.C. ऑफिस मध्ये बसून,
टाय, कोट घालून, हातात विविध ग्रहांच्या अंगठ्या
आणि हो महागड्या ब्रॅण्डची मनगटावर घड्याळ बांधून सांगत होता
मनुष्याने कधी ही काळ्या पट्ट्याची घड्याळ घालू नये
कारण काळ्या पट्ट्याने आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी येते
तसेच तो पुढे सांगत होता मनुष्य गोरा असेल तर
त्याने कोणत्या रंगाची घड्याळ घालावी,
गहू वर्ण असेल तर कोणत्या रंगाची
व काळा वर्ण असेल तर कोणत्या रंगाची घड्याळ परिधान करावी
तर्कासदाखल तो हे ही सांगत होता
मनुष्य गोरा असेल तर त्याने पांढऱ्या किंवा पिंक कलरच्या डायलची,
काळा वर्ण असेल तर पांढऱ्या कलरच्या डायलची,
अन गहू वर्ण असेल तर निळ्या रंगाच्या डायलची घड्याळ घालावी
कारण काय तर हे सगळे रंग शुभ असतात म्हणून
तो उच्च शिक्षित पुढे हे ही म्हणाला
मनुष्याने कधी ही चौकोनी डायलची घड्याळ घालू नये
कारण काय तर मनुष्य मेल्यावर त्याला चौकोनी तिरडीवर जाळतात
किंवा चौकोनी खड्ड्यात पुरतात
त्याऐवजी त्याने अष्टकोनी डायलची घड्याळ घालण्यास सांगितले
कारण काय तर मंदिरात अष्टकोनी मंडळाच्या आत देवाला ठेवलेले असते
ते शुभ असते म्हणून
मित्र हो मी आता पर्यंत घरादाराचे, प्राण्यां संमंधीचे,
बाया–माणसांच्या करणी–कवठांचे,
हाता, बोटात ग्रहांच्या अंगठ्या, गळ्यात माळा घालण्याचे,
ताबीज बांधण्याचे, मांत्रिकाचे स्मशानात अघोरी कृत्य करण्यासंमंधी
अंधश्रद्धा ऐकल्या होत्या
पण त्या महाविद्वानाने त्यात घड्याळाचा ही समावेश करून,
दिलोदीमागाने तो किती अशिक्षित आहे दर्शवून
येणाऱ्या उदयाच्या वेळेला ही शुभशकुनात अडकवून कलुषित केले आहे
मित्र हो दोष त्याचा नाही, तुम्ही ही अशाच लोकांच ऐकता
मग तुम्ही कशाचे सुशिक्षित
हे असल भलत–सलत मनात भरवून देणाऱ्यांपेक्षा तर
महामूर्ख तुम्ही आहात
असल्या घाणेरड्या लोकांनी सांगितलेल्या
डायलची, रंगाची घड्याळ मनगटावर बांधून
डोक गहाण ठेवून
त्यात शुभ वेळ पाहण्यात आपला बहुमोल वेळ खर्ची घालता आहात