घोटाळे असामांन्यांचे

 

नेता, अभिनेता वा असो गर्भश्रीमंत

वागण असो यांच कसही

असो यांचे बोलणे खरे वा खोटे

खरेच हे लोक आहेत मोठे

यांनी करोत किती ही मोठे घोटाळे

वा घ्यावीत निष्पापांची प्राणे

वा मारावी दुर्मिळ प्राणी वा हरणे

दयाव्या अभद्र शिव्या वा करावी गुंडागर्दी

रहावे समाजकंटकांच्या सान्निध्यात

वा बाळगावी प्राणघातक शस्त्रे

घडवून आणावी प्राणहानी, वित्तहानी

वा करावे विस्फोट दारूगोळ्यांचे

स्वतःचा जीव वाचविण्यास

घ्यावा जीव निरापराध्याचा

पैसा, प्रसिध्दी अन ताकद यांच्याशी ज्यांचे असे साटेलोटे

हे लोक खरच आहेत मोठे

 

आम्ही सामान्य माणसे

भुलावी यांच्या खोट्या भाषणांना,

भाळावे त्यांच्या व्यक्तिरेखेला,

त्यांच्या सौंदर्याला, त्यांच्या पेहेराव्याला

ते करोत किती ही गुन्हे,

घोटाळे वा देशविरोधी कृत्ये

घालून त्यांची पापे पाठीशी

आम्ही चाहतो त्यांस अगदी दिल से अन जान से

खरच आहोत आम्ही छोटी माणसे

 

मोठ्या माणसांनी करोत कुठलाही गुन्हा

तयास नसे कशाचेच वावडे

त्यांच्यासाठी कायदे पायदळी तुडे

सामान्य माणसासाठी मात्र

चिंधीचा साप बने

त्याच्यासाठी न निघे कुणा मोठ्या माणसांचा मोर्चा

वा त्याच्यासाठी न कुणी व्यक्त करे हमदर्दी

तरी ही हा सामान्य माणूस दळभद्री

यांच्या माग करे गर्दी

 

खरच ही मोठी माणस आहेत चाणाक्ष

सामान्य माणसांना स्वप्नात रंगवून,

त्यांना खोट्या भूलथापा देऊन

गुंतवून ठेवती मायाजाळात

हा सामान्य माणूस समजून यांना खर

भटकत राही दारोदार अन रानोमळ्यात