जगातले सारे देव, धर्म "सर आँखो पर"

 

मी मंदिर, मस्जिद, चर्चमध्ये जातो

तिथे झुकून त्याची इबादत करतो

दिवसभर जो अपमान सहन केला, लोकांची बोलणी खाल्ली,

कस फसविल्या गेलो त्याची कळवळून कैफियत मांडतो

 

मी विधात्याचे महत्व जाणतो

त्याचा धर्म खुंटीला टांगतो

त्याच्या समोर सर्व सारखे, त्याला ना बाट कुणाचा

ना कुणाच्या जातीधर्माच काही घेणदेण हे मी मानतो

 

तिथला विधाता ही अल्ला, गॉड, प्रभू का नेक बंदाम्हणून

माझ्याकडे कनवाळूपणे पाहतो,

पोटाशी कवटाळून मला चाहतो

रडतो मी त्याच्यापुढे,

दया येऊन तो माझ्यावर कृपा करतो

होईल सगळ चांगल म्हणून धीर धर म्हणतो

 

हे सर्वोच्च परमात्मेच जर सगळ्यांवर कृपा करतात

तर आपण मानवजात आहे तरी किस झाड की मुली

कोणाला असो कोणत्या देवाबद्दल, धर्माबद्दल राग

समजत असतील ते त्यांना श्रेष्ठकनिष्ठ

पण सगळ्याच देवांची मानवावर असते कृपानजर

म्हणून माझ्यासाठी जगातले सारे देव अन धर्म आहेत

सर आँखो पर