जलसंकट

 

नदयानाले कोरडे पडले, धरेवर जलसंकट ओढले

आधी हॉटेलात पोऱ्या आपले पाचही बोटे ग्लासात टाकून,

पाण्याने भरून, टेबलवर ठेवायचा

आता घाणेरड्या मळकट प्लास्टिकच्या बाटल्या दिसतात तिथे ठेवलेल्या

ते पाहून इच्छा होत नाही पाणी पिण्याचा

 

जाता कुणाच्या घरी आधी सुगंधित वाळा टाकलेले

थंडगार माठातले पाणी प्यायला मिळायचे

आता तर गावातच टँकरने पाणी पुरवठा होतो

पाहुण्याला पाहून घरवाला अंगणातूनच त्याला हाकलून देतो

 

लहानपणी नदया दुथडी भरून वाहायच्या,

बारमाही वाहणाऱ्या नदया असायच्या

त्यात गावातल्या बायका कपडे धुतांना दिसायच्या

आता तर कोरड्या ठणक पात्रात

JCB मशीन वाळू उपसतांना दिसावयास मिळायच्या

 

पाणपोई किंवा कुणाच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेली पाणेरी

आता इतिहास जमा झाली

माठात पैसे टाकून पाणी पिणारी कावळ्याची जमात जन्मास आली

महागड्या बाटल्या घेऊन पाणी पिऊ लागली

अन रिकाम्या बाटल्या तिथेच टाकून जलसंकटाची चाहूल देऊ लागली

 

पावसाळ्यात पडे वारेमाप पाणी पण त्याचे नियोजन नाही

पुराच्या पाण्यात अख्खे गाव जलमग्न होई

पण धूर्त, चाणाक्ष कोरडा दुष्काळ पडण्याचीच वाट पाही

 

सरस्वती लुप्त झाली, गंगेस ही ओहोटी आली

कृष्णेसाठी राज्यांमध्ये भांडणे चालली

हापश्यांचे हॅन्डपंप तुटले, विहिरीने तळ गाठले

तलाव, ओढे आटले अन त्यातले जलचर मिटले

 

मित्र हो, नका याकडे कानाडोळा करू, चला पाण्याची शेती करू

पाणी अडवू, पाणी जिरवू

 

जशा नदया, विहिरी आटून त्यातले जलचर मिटले,

उद्या आपली ही अवस्था तशीच, नाही राहणार आपण कुठले

नका विसरू जल ही जीवन है, जल है तो कल है

एक बुंद पानी का जिंदगी है

जर का पाण्याने तळ गाठले, होईल आपले जीणे वाळवंटातले