जागृत मंदिर अन दर्गा

 

जागृत हनुमान मंदिर“,

विघ्नहर्ता गणेश“,

नवसाला पावणारी देवी“, वा

मुराद पुरी करनेवाला पीर का दर्गा

जेव्हा वाचावयास मिळतात

रस्तोरस्ती अशा पाट्या, मन होते उद्विग्न

वाटते तोडून टाकावे ते मंदिर अन दर्गे,

काढून टाकाव्या तेथून मुर्त्या

अन हटवून टाकावे ते थडगे

 

तेथे देव, पिरांच्या नावाने सजती मोठ्या जत्रा

त्यात पुजती रंगविलेला फथरा

अंगात देवी आल्याच नाटक करून,

जागच्या जागी डोलून,

जळते निखारे हातात धरून, त्यावर पळून

उच्छाद मांडती नकलाकार,

केस मोकळे सोडून, अंगावरचे कपडे फाडून,

कापती मारीमायच्या नावाने कोंबडे, बकरे

अमावस्या, पौर्णिमेचे भय दाखवून

वडाच्या झाडाखाली करती करणीकवठे

दरवाज्यावर शनीची बाहुली, घोड्याची नाल ठोकून

मंतरलेले बिबे, लिंब व मिरच्या

फेकती शेजारच्याच्या अंगणात हे दिवटे

 

एवढच नव्हे, नवरात्रात अखंड ज्योतीच स्तोम ही माजते,

कुठे मनोकामना यज्ञ ही सजते,

मोठमोठ्या पेंडॉलात विदुषकी कथाकार देव बनून,

गळ्यात हारफुलांच्या माळा घालून, जनतेस ठगते

उत्सवात डी. जे. च्या तालावर कर्णकर्कश संगीत वाजवून,

विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा विचार न करून,

वृध्दांच्या आजारपणाची तमा न बाळगून,

दारू पिऊन टारगट टोळके अभद्र नाचते,

कुणा झाडाला कल्पवृक्ष संबोधून, ते तीर्थक्षेत्र बनवून

त्या झाडाची पाने पैशाच्या पाकिटात, तिजोरीत ठेवून

ट्रकभर पाने तोडून, त्याचा काढा, च्यवनप्राश बनवून

हिरवकंच झाड अस्थिपंजर करून स्वतः भरगच्च पैसे कमविते

मोबाईलवर देवाचे मेसेज पाठवून, भय दाखवून

तो शंभर लोकांस पाठविण्यास बाध्य करून

नाही तर होईल नुकसानम्हणून मनी वसवते

 

हा कसला देव अन कसली हि त्याची भक्ती

देवाच्या नावावर कल्लोळ माजवून

शहाणे, सुशिक्षित ही बिनडोकासारखे वागती

पुतळे, थडगे बांधून, त्यावर टिनाचे शेड टाकून

मूठभर स्वार्थी आपला उदरनिर्वाह चालविती

अरे खरोखरच देव आहे अन तो स्वयंभू आहे

तर कश्याला हव्यात हया असल्या पाट्या

आपला भक्त्त मंदिरात, दर्ग्यात न येता ही

तपोबलाने, अंतर्यामी होऊन स्वये तिथला देव

दुरितांच्या संकटांचे, त्रासाचे करून स्मरण

न मागता वर्गणी वा मिठाई

आपोआपच करेल भक्ताच्या दुःखाचे हरण