जातपात

 

काय जातीपातीच घेऊन बसला

नुसत जातीन नसते होत माणूस मोठा

अस असत तर

संत नामदेव, संत तुकाराम,

संत गाडगेबाबा, संत रविदास

हे झाले नसते संत

अन डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

डॉ. अब्दुल कलाम वा मदर टेरेसा सारखे

झाले नसते शास्त्रज्ञ वा विचारवंत

 

अरे जातीच काय घेऊन बसला

जातीभेद विसरा

जातीला समाजमनाच्या वेशी बाहेर हाकला