जाता पर्यटनाला एके दिवशी
कळले त्या ठिकाणी आहे एक चर्च प्राचीन चारशे वर्ष जुने
उत्कंठा दाटली मनी, पाहण्या गेलो तो ऐतिहासिक वारसा
जो बांधून गेले आमचे पूर्वज इतक्या मेहनतीने
खरोखरच किती भव्य दिव्य होते ते चर्च, आवार ही मोठा प्रशस्त
कुठे ही तुटले, खचले नव्हते, उत्तम रंगरंगोटी, आसपासचा परिसर ही स्वच्छ
दिसे नुकतेच नवीन बांधल्यासारखे दुरुस्त
आत जाताच त्याचा भव्यपणा पाहून झालो थक्क
उंचच उंच बुरुज, उत्तमोत्तम नक्षीकाम, त्यावर बारीक कशिदाकारी
अन भिंतीवर जीवंत वाटावे असे संतांचे चित्र
पाहतच राहिलो मी, अक्षरशः देहभान विसरलो
तोच जाता समोर लक्ष मनी विव्हळलो
समोर एका क्रुसावर शांतिदूत प्रभू येशू होता
सर्वांगात खिळे ठोकून, रक्तबंबाळ लटकून,
त्यासमोर होते लख्ख दिवे झळकून,
अन काचेच्या पात्रात तरल पदार्थ ओतून
पाद्री करत होते वाचन बायबलचे त्याचे पावित्र्य राखून
समोर होता जनसमुदाय पाहत होता चर्चचे सौंदर्य मनभरून
कोणी फोटो काढत होता, तर कुणी सेल्फी घेत होता प्रभू येशूला बिलगून
तशीच मला भोवळ आली अन मी पडणार
तोच पकडून समोरचा बेंच बसलो त्यावर खाली
मान झुकली, घश्यास कोरड आली अन डोळ्यातून अशृ वाहली
किती स्वार्थी आम्ही माणसे, क्षणिक सुखाच्या मागे लागलो आहे
आम्हाला धर्मस्थळाच पावित्र्य नाही
अन त्यात वसलेल्या परमात्म्याचा त्याग माहित नाही
ज्या वास्तूत राम, रहीम, गॉड राहतो
त्या धर्मस्थळा ही आम्ही पर्यटनस्थळ म्हणून पाहतो
क्रुसावर चढलेल्या, वनवास घडलेल्या वा अग्नीत पोळलेल्या
परमपित्याला एक शोभेची वस्तू म्हणून तिथे ठेवतो
आलो तसाच भानावर, पाहिले कळवळून त्या क्रुसावरच्या शांतिदूताकडे
वाटली माझीच मला लाज, तो दयाळू हसून माझ्याकडे होता पाहात
किती संकुचित वृत्तीचे आम्ही, केवळ संकटात ठेवतो त्यास ध्यानात
मनोभावे जोडले तयास हात, निघालो तेथून क्षमा मागत मनात