देव ही जाती–धर्माच्या नावान ओळखू लागला
बामनाचा देव, कुणब्याचा देव, हिंदू–मुसलमानांचा देव म्हणून संबोधू लागला
बामनाचा देव सोवळ्या–ओवळ्यात राहू लागला
तर कुणब्याचा देव आपला समाजबांधव जसा ठेवेल तसा वागू लागला
प्रत्येकजण आपल्या धर्माची साजरी करे वेगळी जयंती
अन त्यांच्या समारंभात दुसऱ्या समाजाचा व्यक्ती जाताच
“हा आमच्या समाजाचा देव आहे, तू इथे कशास आला” म्हणून
त्यास तेथील मंडळी तेथून हाकलून देती
प्रत्येक समाजाच्या बॅनरवर त्यांच्या त्यांच्या जातीच्या संतांचा दिसे फोटो
दुसऱ्या कोण्या समाजाने वापरला त्या संतांचा फोटो तर त्यासाठी होये Fight
जणू काही संतांचा Particular समाजानेच घेतला Copyright
फक्त विनंती त्या संतांना जरी तुम्ही विभागले जाती–समाजात
तुम्ही तरी कुणाचा द्वेष नका धरू
झुकला तुमच्या समोर कुणी आदराने, “तू माझ्या जातीचा नाही” म्हणून
त्याच्या ढुंगणावर लाथ नका मारू
आशीर्वाद द्यायचा नसेल नका देऊ, घ्या डोळे बंद करून,
निदान त्याची “जात” तरी नका पाहू