जातीसाठी नका भांडू

 

काय ओपन, ओबीसी, एस.सी, एस.टी, अल्पसंख्याक म्हणून भांडता

अन आपल्याच भाऊबंदांचे हक्क हिसकावून एकमेकांचे रक्त सांडता

अस कुठ पर्यंत तुम्ही

ओपन, ओबीसी, एस.सी, एस.टी, अल्पसंख्याक म्हणून राहणार

यातला एक कधी ना कधी तरी बहुसंख्याक होणार

न राहणार मग कुणी

ओपन, ओबीसी, एस.सी, एस.टी, अल्पसंख्याक

सगळेच सारखे राहणार, सगळेच हाताला काम मागणार

पण तेव्हा नसेल कुठलेही आरक्षण

मग आपण स्वजातीयांविरुद्धच लढणार

जिस की लाठी उसकी भैसम्हणणार

असे करता करता एक दिवस कुणी परकीय आपल्यावर राज्य करून

आपण गुलाम होणार

 

पहा करा विचार, आपला भारत देश आहे, सुजलाम सुफलाम आहे

आपल्यातील मतभेद, दुरावे,जातीपातीचे प्रश्न आपण गुण्यागोविंदाने सोडवू

ते सोडविण्याची आपल्या तमाम भारतीयांत क्षमता आहे

उगाच कुणा तिसऱ्या आगंतुकाला आपल्यात मध्यस्ती करायला नका बोलवू