जाती-धर्मात भांडण लावणाऱ्यांपासून राहा दूर

 

मित्र हो, जेव्हा आपण समाजात वावरतो

तेव्हा प्रत्येकाकडून मदत घेतो

हिंदूंकडून भाजीपाला घेतो, मुस्लिमांकडून घर बांधून घेतो

तर ख्रिश्चनांकडून घरगुती उपयोगाचे सामान खरेदी करतो

हया गोष्टी जर आपल्याला चालतात,

त्याचा आपल्याला बाट होत नाही

तर का मग जातीसमाजाबद्दल आपण द्वेष बाळगतो

अहो आजारी पडताच आपण दवाखान्यात जातो

तिथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन डॉक्टरांच्या हातून इलाज करून

आपले प्राण वाचताच त्यास देवदूतासम मानतो,

स्वतःस सवर्ण समजतो अन मोलकरणीच्या हातून घरकाम करून घेतो

तेव्हा मात्र उच्चनिच्चतेच्या साऱ्या शृंखल्यांचा विसर पडतो

 

मित्र हो, कुणी श्रेष्ठ नाही अन कुणी कनिष्ठ नाही

सगळे समान आहेत, सगळे सगळ्यांवर अवलंबून आहेत

हया गोष्टींवर थोडा तरी विचार करा

ओळखा आपल्या नरातील नरोत्तमा

 

जातीधर्मात भांडण लावणाऱ्यांच्या ढुंगणावर मारा जोरात लाथ

राहा त्यांच्यापासून दूर दोन हात