मानवात किती स्वार्थ आहे बघा देवालाही चुत्या बनविते
अन घरात काही खुशीचा प्रसंग असला तर
इष्टमित्रांसहित पार्टी करून अन्नाची नासाडी करते,
मिठाईचे डबे लोकांना वाटते
देवासमोर प्रसाद म्हणून एक पेढा
नाहीतर छोट्याश्या थाळीत पंचपक्वान्नांचा नैवेद्य ठेवते
अन पूजा होताच देवापुढचा प्रसाद स्वतःच पटकन खाते
थाळीतला पंचपक्वान्नांचा नैवेद्यही त्याला पुरत नाही
तो जनावरांपुढे ठेवण्याऐवजी स्वतःच्या पोटात ठुसते
देवाच्या फोटोला हळद, कुंकू वाहते
अन भोळ्या–भाबड्या जनतेला गंडवून, त्याचा जीव घेऊन,
कुणाच्या माय–बहिणीच्या कपाळाच कुंकू पुसते
आपल्या महागड्या गाडीत
कुणा साधू–संतांच्या पादुकांची मिरवणूक काढते
पण गरिबाकडे पाहून
“चला बसा माझ्या गाडीत पोहोचवून देतो तुम्हाला“
अस म्हणण्याची त्याला इच्छा न होते
शेवटी हेच खर
“ज्याच्या गळ्यात १०८ मणी त्याच्यासारखा लुच्चा नाही कोणी“