ज्योतिषी

 

ज्योतिष सांगणाऱ्यांनी जणू काही

ग्रह, तारे अन देवच खरीदले

मनात येत असतील नकारार्थी विचार

तर म्हणतात बुध खराब आहे

नवराबायकोत बेबनाव असेल

तर म्हणतात शुक्र खराब आहे

कामात अडचणी येत असतील

तर म्हणतात साडेसाती आहे,

शनी महाराज नाराज आहे

करोडो अब्जो दूर असलेले हे ग्रहतारे

ज्यावर ना जीवसृष्टी ना पोषक वातावरण

खरंच त्यांना एवढं दुरून

कराव मानव जातीच वाईट

होत असाव याच स्मरण

बर हे ज्योतिषि एवढ्यावरच थांबत नाहीत

तर त्यावर हे उपाय ही सांगतात

घरात लक्ष्मी थांबत नसेल तर

लक्ष्मीला वहा एक लाल फुल,

कार्यसिद्धीसाठी वहा एक पाव तांदूळ

किंवा शनीला वहा चमचाभर तेल

अरे बेवकूफ हो, समजत कस नाही

ज्या देवाला सुखसमृद्धी मागता

जो सुखसमृद्धीचा कारक आहे

तो भिकारी आहे का

कि हे तुमच कद्रू सारख वाहून

टाकेल तो कृपावर्षावात न्हाऊन

 

पुढे ज्योतिषी हे ही सांगतात

कि काळ्या गाईला पोळी खाऊ घाला,

पांढऱ्या गाईला नैवेद्य खाऊ घाला,

भुऱ्या गाईला चारा खाऊ घाला

अरे बिनडोक हो, समजत कस नाही

कि आई कुठल्याही रंगाची असो

तिला कुणाकडून ही कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते

ती वात्सल्यमूर्ती देऊन कृपेचा आशीर्वाद

सदैव चांगलच चिंतीत असते

 

ज्योतिष, कर्मकांड हे आहे सर्व थोतांड

सोडा याचा नाद

हे ज्योतिष सांगणारे आहेत लालची

खरच ग्रहताऱ्यांची पूजा करून

येत असती समृद्धी, होत असत चांगल

तर स्वतः सुखी, समृद्ध होऊन

कशास यांनी लोकांच असत भल चिंतल