झाकून नका जपू माळ

 

मी कधी इतर लोकांसारख हातावर कपडा झाकून माळ जपत नाही,

दार बंद करून व्रतवैकल्ये करीत नाही,

दोनचार दाणे स्वतःच्याच हाताने पाखरांना टाकित नाही

वा भगवान सबका भला करना, शुरुवात हमसे करनाअसे म्हणत नाही

 

मी तर राजरोसपणे सर्वांसमोर, सर्वांच लक्ष माझ्याकडे जाईल, अशा प्रकारे

जोरजोरात मंत्रोच्चार करीत माळ जपतो व देवाला म्हणतो

मला माळ जपतांना बघणाऱ्या प्रत्येकाला माझ्या पुण्यातल थोड पुण्य लाभू दे“,

मी दारे, कवाडे, खिडक्या उघडून, उदबत्तीचा धूर अन आरतीच्या घंटीचा आवाज,

सर्वांना ऐकू जाईल या स्वरात व्रतवैकल्ये करून

सर्वांनी अस व्रत करून आपल्या घरात सुखसमृद्धीसाठी प्रयत्न करावे म्हणून

पूजेकरिता त्यांना माझ्या घरात बोलावण्याचा प्रयत्न करतो,

पक्षांना दाणे टाकतांना मी माझ्या वाटीतील दोनचार दाणे

आजूबाजूला उभे असणाऱ्या बायाबापड्यांनाही वाटायला देतो

जेणे करून त्यांना ही पुण्य मिळून

त्यांच्यावरील थोडा तरी दुःखाचा भार कमी व्हावा

देवाला मागतांना भगवान सबका भला करनाइतकच म्हणतो

पण शुरुवात हमसे करनाकधीच म्हणत नाही

 

मित्रहो, कपडा झाकून माळ जपणे, दार बंद करून व्रतवैकल्ये करणे,

दोनचार दाणे स्वतःच्याच हाताने पाखरांना टाकणे,

अन भगवान सबका भला करना, शुरुवात हमसे करनाअसे म्हणणे

म्हणजे स्वतःतील हीनपणा होय दर्शविणे

 

सोडा हो हा स्वार्थीपणा, सगळ्यांची भलाई चिंता

सोबत काय घेऊन जायचे आहे, कशाला माजता

सर्व इथेच सोडून, कमविलेल्या पुण्याच्या भरवश्यावरच,

चालायचा आहे स्वर्गाचा रस्ता