ठेवा आपला जात-धर्म घरात

 

जात माझी घरात,

धर्म माझा घरात,

देव माझा घरात,

धर्माचरण माझे घरात

 

बाहेर पडता उच्चनिच्चतेचा माझ्यावर नसे टॅग

ना कुणास काय सवलती मिळतात त्याचा राग

ना सामाजिक विषमतेबद्दल डोक्यात आग

शिक्षणाचा नसे आब, श्रीमंतीचा नसे माज

माणूस म्हणून वावरणे

समूहाने किंवा community ने मदत केली

असा ही नसे माझ्या प्रगतीचा राज

 

खांदयास खांदा लावून काम करतो,

स्त्रीत्वाचा सन्मान राखतो,

पाण्यासम सर्वांत मिसळतो,

कोण काय म्हणेल याची पर्वा न करतो

सर्वांस समान लेखतो,

माणूस म्हणून जीवन जगतो

 

घरी येताच जातीधर्माची, पंथाची वस्त्रे अंगी घालतो

धर्मात जे जे चांगले तेवढेच मी अनुसरतो

एकांतात बसून दिवसभरात भेटलेल्या मानवांतील

देव, अल्ला अन येशू समोर नतमस्तक होतो

 

फक्त घरातच मी जातीधर्माचा अन प्रांताचा होतो

घराबाहेर पडताच धर्मनिरपेक्ष भारतीय बनतो