तमाशे करण सोडा

 

प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी

सगळ्यांच्या मुखे राम होता,

स्वप्नात ही देवाच नाव न घेणारा

त्या दिवशी जय श्रीरामम्हणत होता

अन जोरजोराने नाचत

राम का बच्चा बच्चा जय श्रीराम…..”

हे गाण म्हणत गळे काढत होता

 

हे असे ऋतूनुसार बदलणारे माणस बाकी दिवशी

त्याच रामाच्या किंवा अन्य कोणा देवाच्या फोटोसमोर बसून

मदिरामांस भक्षण करतील,

त्या पुरुषोत्तमासमोर बायकोला शिवीगाळ, मारझोड करतील

अन मंदिराच्या आडोश्यालाच लघुशंका उरकतील

अन उत्सवाच्या दिवशी मात्र सगळे रस्ते, गल्ल्या झाडून,

जागोजागी रांगोळ्या काढून, फुल आच्छादून

त्या रामाचा, त्या देवाचा, अल्लाचा, येशूचा झिंगझिंगाट करतील

 

अहो हे तमाशे करण सोडा, आधी स्वतःला बदला,

त्या देवाची विचारसरणी अंगी बाणगा

नंतर त्या देवाची स्मृती उरी जागवा