मित्र हो, काही गावांमध्ये अतिप्राचीन जागृत देवस्थान/ दर्गा असतो
लांबून मोठ्या भक्तिभावाने लोक तिथे दर्शनाला येत असतात
पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का ?
त्या तीर्थस्थळी जाण्याकरिता व्यवस्थित वाट नसते,
रस्ता कच्चा अन तो ही जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेला
मोठ दिव्य पार करत तिथे दर्शनाला जावे लागते
परंतु भाविक मंडळी नवी गाडी घेतली, नौकरी लागली,
धंद्यात बरकत आली तर, न चुकता, पहिले तिथे पूजा करायला जातात,
पंगत देऊन शंभर लोकांना जेवायला बोलावतात
पण तिथे असलेल्या गैरसोयींकडे मात्र कानाडोळा करतात
लोकांना त्या तीर्थस्थळी येण्याकरिता अडचण होऊ नये म्हणून
तिथली गैरसोय टाळण्याचा प्रयत्न ही करीत नाहीत
ज्याप्रमाणे नवीन गाडी विकत घेऊन भक्त तिथे दर्शनाला येतात
त्यापरीसच ते तिथे स्वतःच्या पैशाने रस्ता बांधत नाहीत,
लोकांना तिथे बसायला, रहायला जागा नाही म्हणून
उन्हापासून बचाव करण्याकरिता निवाऱ्याची ही सोय करीत नाहीत
आजूबाजूला घाण साचून दुर्गंधी पसरू नये म्हणून
स्वच्छतालये उभारत नाहीत
फक्त स्वतःस ख़ुशी झाली म्हणून लाखोंचा खर्च करतात
अन तिथल्या देवाला/पीराला तसाच अडचणीत, त्रासात सोडून
आपल्या महागड्या गाडीत बसून निघून जातात
याला म्हणाव काय ……..
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शब्दांत सांगावयाचे तर–
“मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव…… “