एका तीर्थक्षेत्री गेलो, दर्शन घेतल अन बसलो समाधानान
झाडाच्या पारावर इकडे तिकडे पाहत
तोच मला दूर एके ठिकाणी खेळ खेळत
काही बाया–पुरुष मंडळी घोळका करून खिदळतांना होती दिसत
नवल वाटले, काय असावे म्हणून कुतूहलाने मी ते पहायला गेलो
एक युवक एका गोल दगडावर पाच रुपयाच नाण ठेवून
त्यावर आपले पूर्ण वजन देऊन, दोन्ही हात झाकून, डोळे बंद करून,
मनात मनोकामना बोलून तो दगड फिरतो की नाही हे होता पाहत
त्याची नातेवाईक मंडळी ही उत्कंठतेने तो दगड फिरतो की नाही
हे डोळ्यात तेल टाकून होते न्याहाळत
तोच कुणी एक पोट्ट वस्नावल “दगड फिरला…… दगड फिरला…..”
तोच दगडावर हात ठेवलेला युवक आनंदाने नाचू लागला
व मनोकामना पूर्ण होईल म्हणून सांगू लागला
त्या दगडासमोर बिडी पित बसल्या एका जटाधाऱ्याने
तो पैसा उचलला व आपल्या चंचीत ठेवला
युवकाला मनोकामना पूर्ण होण्याचा मिळालेला कौल पाहून
बाकी लोक ही त्या दगडावर नाण ठेवून, त्यावर हात ठेवून
आपली मनोकामना पूर्ण होते की नाही घेऊ लागले जाणून
ते पाहून मी त्या जटाधाऱ्याला “बाबा, काय आहे हे” विचारल नवल वाटत
त्यान माझ्याकडे पाहिल व शांतपणे नाकातून बिडीचा धूर काढत म्हंटल
“हा चिंतामणी दगड आहे, याच्यावर पैसा ठेवून, आपला हात त्यावर झाकून
करून काही कामना मनात, फिरता दगड होई इच्छा पूर्ण क्षणात“
असे म्हणून “तुम्हीही असे करून घ्या प्रचिती” होता तो म्हणत
ते एकूण अंगावर शहारे आले
विज्ञानाचा नियम आहे “गोल दगडावर जोरदार वजन दिल्याने तो हलणारच“
आज आपल्या देशातला प्रत्येक युवक शिकलेला आहे
त्याला वडिलधाऱ्याच म्हणन नाही पटत पण हे असले धंदे बसते करत
अन दगडधोंड्यात आपल अस्तित्व बसते शोधत,
आजमावीते आपल भविष्य अशा दगडांवर हात ठेवत
त्याच्या हलण्याला तो काळ्या पत्थरावरची रेष मानतो
पण कुठ काम करून, काही उद्योगधंदा करून मेहनत करण्याच टाळतो
“अजून माझा टाईम यायचा आहे” म्हणून माय–बापाच्या भरवश्यावर जिंदगी काढतो